- Advertisement -
- Advertisement -

मराठीतील हे दिग्गज संगीतकाराने पहिल्यांदाच रचले आयटम सॉंग

आपल्या सोज्वळ संगीताच्या चौकटीबाहेर पडून त्यांनी आता चक्क आयटम सॉंग रचले आहे.

मराठी चित्रपटश्रुष्टीतले ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी आजतागायत सुमधुर आणि सुरेल संगीत निर्माण केले आहे. पण आपल्या सोज्वळ संगीताच्या चौकटीबाहेर पडून त्यांनी आता चक्क आयटम सॉंग रचले आहे.  

झाले असे की सिनेदिग्दर्शक समीर आठल्ये यांनी पत्कींना ‘बकाल’ या आगामी चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवली. सुरुवातीला अशोक यांनी नकार दिला पण समीर यांच्या आग्रहाखातर ते तयार झाले. अशोक समीर यांना म्हणाले “अरे समीर तू माझी चौकात मोडलीस आणि हे ढाक चूक ढाक चूक संगीत करवून घेतलेस, इथपर्यंत ठीक होतं. आयटम सॉंग काय? मी कधी केलंय का? आणि शब्दरचना ऐकून तर मी हे असले आयटम बीयटम नंबर अजिबात करणार नाही. मला ते जमणार नाही. वयाची अठ्याहत्तरी झाले रे.” 

त्यावर समीर म्हणाले “आता चौकात मोडलीच आहे तर पूर्णच मोडा. हे गाणं तुम्हीच करायचं. हवं तर नंतर गोमूत्र शिंपडून घ्या.” अखेर पत्की यांनी “छम छम बर्फी संत्र्याची” हे गाणं केलं.  माधुरी करमरकर, जान्हवी अरोरा, कविता राम आणि अमृता दहिवेलकर यांनी हे गाणे गायले आहे.  

राजकुमार मेन्डा निर्मित बकाल हा चित्रपट ८ नोव्हेंबर, २०१९ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.

- Advertisement -

Latest Stories

- Advertisement -