आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘झोंबिवली’चे मोशन पोस्टर प्रदर्शित; अधिक पटीने वाढणार चित्रपटाची उत्सुकता

प्रेक्षकांना झोंबीची छोटीशी झलक पाहायला मिळणार आहे कारण 'झोंबिवली' चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. मोशन पोस्टरची झलक पाहण्यासाठी खालील लेख वाचा.

काही दिवसांपूर्वी,  हॉरर-कॉमेडी या जॉनरचा ‘झोंबिवली’ या मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले होते आणि त्या ऑफिशिअल पोस्टरमुळे सर्वत्र सिनेमाची चर्चा रंगली. आपल्या मराठीत झोंबी पाहायला नक्कीच सर्वांना आवडेल आणि त्यांना पाहण्यासाठी उत्सुकता देखील वाढली असेल.

आता प्रेक्षकांना झोंबीची छोटीशी झलक पाहायला मिळणार आहे कारण ‘झोंबिवली’ चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. आतापर्यंत प्रेक्षकांनी हिंदी आणि इंग्रजी सिनेमात झोंबीज् पाहिले आहेत, पण ‘झोंबिवली’च्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठीमध्ये पण आता झोंबीज् पाहायला मिळणार आहेत.

मोशन पोस्टर हे सिनेमाप्रती उत्सुकता वाढवणार यात शंका नाही. झोंबींचे व्हिज्युअल, सुप्रसिध्द संगीतकार ए.व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी दिलेले बॅकग्राऊंड म्युझिक, एकंदरीत मोशन पोस्टरचा इफेक्ट या सर्व गोष्टींसाठी प्रेक्षकवर्गांकडून पुन्हा एकदा चित्रपटाचे कौतुक होणार हे नक्की.

सारेगम प्रस्तुत ‘झोंबिवली’ चित्रपटाची निर्मिती Yoodlee Films यांनी केली आहे. तर सुप्रसिध्द सिने दिग्दर्शक आदित्य सरपोतदार दिग्दर्शित या चित्रपटात अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट २०२१ ला प्रदर्शित होणार आहे.

Latest Posts

you may like