- Advertisement -
- Advertisement -

विक्की वेलिंगकर मध्ये स्पृहा जोशी दिसणार या भूमिकेत

पहा स्पृहा जोशी आपल्या विक्की वेलिंगकर मधील विद्याच्या भूमिके बद्दल काय म्हणते.

विक्की वेलिंगकर या चित्रपटाच्या एक पोस्टरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे पहिले वहिले पोस्टर रिलीज करण्यात आले होते. मुखवटा घातलेल्या एका माणसाचा चेहरा असं साधारण ते पोस्टर होतं. त्यानंतर सोनाली कुलकर्णीचा फोटो असलेलं एक पोस्टर रिलीज करण्यात आलं. आणि आता स्पृहा जोशी चा फोटो असलेले एक पोस्टर रिलीज झाले आहे.

स्पृहा या चित्रपटात विद्या नावाचे पात्र साकारत आहे. ती विक्कीला वाचवू शकेल का? आपल्या भूमिकेबद्दल बोलताना स्पृहा म्हणतेमला सौरभ वर्मा यांची कथा सांगण्याची शैली खूप आवडली. ज्या प्रकारे ते कथा सांगत होते त्यावरून या चित्रपटाची कथा खूप वेगळी आहे आणि या कथेत असं काही आहे जे मी या आधी कधीही पाहिलेले नाही. कथा ऐकल्यानंतर माझ्या भूमिकेची लांबी किती आहे याचा मी विचार केला नाही कारण मला माहित आहे की विक्की वेलिंगकारच्या कथेत  विक्की हा विद्याशिवाय अपूर्ण आहे. मला हि भूमिका साकारताना खूप मज्जा आली आणि मला असं वाटतंय की प्रेक्षकांनाही ही भूमिका बघताना खूप चांगला अनुभव येईल.”

अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार हे चित्रपटाचे निर्मेते असून सौरभ वर्मा हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

- Advertisement -

Latest Stories

- Advertisement -