नव्या कोऱ्या चित्रपटात दिसणार शीतलची दमदार भूमिका

लॉकडाऊननंतर शीतल अहिररावची दमदार एंट्री. सरकारच्या नियमावलींचे पालन करत शीतल अहिररावने केला चित्रिकरणास प्रारंभ

लॉकडाऊन नंतर अनलॉकच्या काळात सरकारने चित्रपटसृष्टीलाही ग्रीन सिग्नल दिला आहे. सरकारच्या नियमावलींचे पालन करत चित्रपट सृष्टीत चित्रीकरणाचा श्री गणेशा झालेला आहे. सरकारने दिलेल्या नियमावलींचे काटेकोर पालन करत संबंध मराठी चित्रपटसृष्टी पुन्हा एकदा जोमाने काम करत पूर्वपदावर आली आहे असे म्हणायला हरकत नाही.

सर्वच हळूहळू पूर्व पदावर येण्याची चित्रे आणि सरकारच्या अटी शर्थीचें पालन व आरोग्याची काळजी घेत अभिनेत्री शीतल अहिरराव हिने तिच्या एका नव्या कोऱ्या चित्रपटाच्या चित्रिकरणास सुरुवात केली आहे. नाशिक येथे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. तूर्तास चित्रपटाचे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आले असून चित्रपटाचा विषय आणि अधिक माहिती अगदी शेवटच्या टप्प्यावर येऊन थांबली आहे. याशिवाय चित्रपटात शीतलसह आणखी कोणते कलाकार झळकणार हे ही गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.

‘व्हीआयपी गाढव’, ‘जलसा’, ‘मोल’, ‘फक्त एकदाच’, ‘होरा‘, ‘सलमान सोसायटी’, ‘H2O कहाणी थेंबाची’ या सारख्या चित्रपटात तर ‘वॉक तुरु तुरु’, ‘लई भारी’, ‘इश्काचा किडा’ या म्युझिक अल्बम मधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. कलाकार म्हणून अंगी असलेल्या मनोरंजन क्षेत्रातल्या या नव्या उभारत्या ताऱ्याच्या कलेला साऱ्याच प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. सातत्याने नवे कोरे आणि चौकटी बाहेरचे विषय असलेले चित्रपट स्वीकारणारी शीतल पुन्हा एकदा एका नव्या कोऱ्या आणि नव्या दमाच्या विषयातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावात अटी शर्थीचे पालन करत आणि कलाकारांच्या मदतीने या चित्रपटाच्या चित्रिकरणाचा शुभारंभ झाला आहे. चित्रपटाचे नाव आणि चित्रपटातील कलाकारांबद्दल जाणून घेण्यास प्रेक्षकांनाही आतुरता लागून राहिली आहे. शिवाय शीतलची एंट्री असलेला हा चित्रपट नेमका कोणता विषय हाताळणार आहे याकडे ही साऱ्या सिनेप्रेमींचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आता हा चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीस केव्हा येतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.