- Advertisement -
- Advertisement -

‘Revisit Cinema’ या वेब शो मधून उलगडणार मराठी चित्रपटांचा इतिहास

सध्याच्या टाळेबंदीच्या सहवासात मनोरंजनाचे साधन म्हणून ओटीटी  प्लॅटफॉर्मकडे पर्यायी नजरेने पाहिले जाते. परंतु या पाहण्यात कुठेतरी मराठी भाषेतील चौकटी बाहेरच्या चित्रपटांकडे दुर्लक्ष होताना ही जाणवते, त्यामुळे हे मराठी सिनेमे, या सिनेमांचा इतिहास, सिनेमाचे वैशिष्ट्य या सर्वच गोष्टी आपसुकपणे आपण गमावतो.

मयुरेश भोर, तेजस साठे, कपिल रेडकर आणि इतर सहकारी यांनी मात्र आता या गमावलेल्या चित्रपटांची सुपीक अशी कल्पना घेऊन एक वेब शो नव्या दमासह प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यासाठी  सज्ज केला आहे. आता मात्र लवकरच हा आगळावेगळा भन्नाट असा ‘Revisit Cinema’ हा वेब शो या चाकोरी बाहेरील चित्रपटांना नव्या स्वरूपात म्हणा वा नव्या अंदाजात पोहचविण्यासाठी तयार झाला आहे.

हा ‘Revisit Cinemaवेब शो ‘R. A. W Films’ प्रस्तुत असून या वेब शो च्या असोसिएशन करिता Freshmint Media चा खारीचा वाटा आहे. नेमके या वेब शो मधून कोणत्या आणि कशा तर्हेने चित्रपटांचा इतिहास उलगडणार याची उत्सुकता आता सतावू लागली आहे. अशा कोणत्या चाकोरी बाहेरच्या चित्रपटांपासून आपण वंचित राहिले आहोत आणि ते चित्रपट पाहण्यासाठी त्यामागचा इतिहास जाणून घेत त्याचा आस्वाद घेणे नक्कीच औतस्युक्याचे ठरेल.

येत्या 12 जून पासून हा नवा कोरा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

YOU MAY ALSO LIKE...
- Advertisement -

Latest Stories