प्रविण कमळे चा ‘ते.. आपल्यातले’ सामाजिक अंतर भासवणारा लघुपट

'ते.. आपल्यातले' सामाजिक अंतराची जाणीव करून देणारा लघुपट 'ते.. आपल्यातले' सामाजिक अंतराची जाणीव करून देणारा लघुपट.

सध्या सर्व जगातच कोविड 19 चे सावट पसरले आहे. कोविड 19 या विषाणूने तर संपूर्ण जगात जणू दहशतच पसरवली आहे. अशा या महामारीच्या आजाराला रोखण्यासाठी शासनाकडून वारंवार करण्यात येणारी घोषणा म्हणजे सामाजिक अंतर(social distance). एका विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी, हा विषाणूचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी या सामाजिक अंतराचा वापर करणे योग्य समजले जात आहे. पणहे सामाजिक अंतर तर आपण गेली कित्येक वर्षे अगदी जबाबदारीने चोखपणे पार पाडत आलोय. ते म्हणजे तृतीयपंथी समाजासोबत. आज गेली कित्येक वर्षे हा समाज आपल्या सोबत आपल्यातला म्हणून राहत आहे पण आपण प्रत्येकाने त्यांच्यासह ठेवला तो संबंध म्हणजे केवळ सामाजिक अंतर.

एका विषाणूला रोखण्यासाठी सामाजिक अंतर आपण पाळतोय खरं पण या तृतीयपंथी समाजातील प्रत्येक जण तर आपल्यातलाच एक आहे याची समज आपल्यात कुठेतरी कमी जाणवतेय. आपल्यातला त्यांच्या बद्दलचा हा समज कुठेतरी नक्की कमी व्हायला हवा किंवा दूर व्हायला हवा म्हणूनते आपल्यातलेहा विषय घेऊन दिग्दर्शक आणि लेखक प्रविण कमळे या लघुपटाचा भाग बनत प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

 Happiness is, वरच्या मजल्यावरची ती, lets clean up यासारख्या लघुपटांची निर्मिती केल्यानंतर आता प्रवीण चौथा लघुपटासह प्रेक्षकांच्या भेटीला आला आहेविघ्नेश जयस्वाल निर्मित  Take Memories Production अंतरगत सामाजिक संदेश देणारा लघुपट निर्माण करून त्याने एका सामाजिक बांधिलकीवर प्रकाश झोत टाकला आहे असे म्हणायला हरकत नाही. दगडी चाळ चिञपटासाठी संवादलेखक, तसेच भेटली तू पुन्हा या चित्रपटांकरिता सह् दिग्दर्शकाची भूमिका चोख बजावत असताना आपल्यातल्या कलेची जोपासना करत प्रविण नेहमीच कार्यशील असतो.

 सध्या सुरू असलेल्या कोविड 19 बद्दल सुरू असणाऱ्या सामाजिक अंतर या बाबीचे औचित्य साधत काळानुसार चालत आलेल्या तृतीयपंथी समाजात आणि आपल्यात असलेले सामाजिक अंतर हे आपल्या मनातून लुप्त होणे आवश्यक आहे ही बाब लक्षात घेऊन प्रविण कमळे या लघुपटाचा भाग बनला आहे.

 लघुपटांची निर्मिती करणे हा प्रविण कमळे चा छंद जरी असला तरी आता लवकरच तो एका नव्या कोऱ्या चित्रपटाच्या दिग्दर्शनातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.