- Advertisement -
- Advertisement -

वेळेवर उपचार न मिळाल्याने अभिनेत्री पूजा झुंजार आणि तिच्या नवजात बाळाचा मृत्यू

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अभिनेत्री पूजा झुंजार आणि बाळाला आपला जीव गमवावा लागला.

चित्रपटांमध्ये काम केलेली होतकरू अभिनेत्री पूजा विष्णू झुंजार हिचे निधन झाले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तिच्या नवजात बाळाचेही निधन झाले आहे. पूजा गरोदर राहिली तेव्हा घरातील सगळीच मंडळी अगदी खुशीत होती. पूजा हिंगोली येथील गोरेगाव जिल्ह्यातील सोनगाव येथे राहत होती. दुदैवाने ग्रामीण भागात कुठल्याही सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने पूजा आणि तिच्या बाळाला आपला जीव गमवावा लागला.

पूजाला प्रसूती कळा सुरु झाल्यावर तिला प्राथमिक आरोग्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.  पूजाची प्रसूती झाल्यानंतर काही वेळातच तिच्या बाळाचा मृत्यू झाला आणि नंतर पूजाची प्रकृती खालावत गेली. पुढील उपचारासाठी तिला हिंगोलीतल्या मोठ्या रुग्णालयात भरती करायचे होते पण त्यांच्याकडे रुग्णवाहिकाच नसल्याने त्यासाठी बरीच शोधाशोध करावी लागली. अखेर रुग्णवाहिका मिळाली पण रुग्णालयात घेऊन जातानाच रस्त्यात तिचा मृत्यू झाला.

पूजाच्या घरच्यांचे असे म्हणणे आहे की प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पूजा आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाला.

- Advertisement -

Latest Stories