‘डॉक्टर डॉक्टर’ चित्रपटातील गाण्याचे चित्रीकरण पूर्ण

सरकारच्या नियमावलींचे पालन करत 'डॉक्टर डॉक्टर' चित्रपटाचे चित्रीकरण केले पूर्ण. अमोल कागणेचे चित्रपटातून घडणार अभिनय कौशल्याचे दर्शन.

कोविड 19 या महामारीच्या संकटामुळे तीन महिन्यांपासून मालिका, चित्रपटांचे चित्रीकरण पूर्णतः ठप्प झाले होते. मात्र आता अवघ्या तीन महिन्यानंतर चित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणाचा श्री गणेशा झालेला आहे. सरकारने दिलेल्या नियमावलींचे काटेकोर पालन करत संबंध मराठी चित्रपटसृष्टी पुन्हा एकदा पूर्वपदावर येण्याच्या वाटेवर जोमाने काम करत आहे. हळूहळू सर्वच पूर्वपदावर येत असल्याची चित्रे आणि सरकारने दिलेल्या सर्व अटी-शर्थींचं पालन करत आणि सेटवर आरोग्याची योग्य ती काळजी घेत ‘डॉक्टर डॉक्टर या चित्रपटातील गाण्याचे चित्रीकरण पुन्हा एकदा नव्या जोमाने पार पाडले.   लॉक डाऊन नंतर वेळ न दवडता त्याच्या आगामी ‘डॉक्टर डॉक्टर’ या चित्रपटातील गाण्याचे चित्रीकरण सह कलाकार आणि इतर टीमच्या साहाय्याने कोरोना महामारीच्या संकटात चित्रीकरणाचा विडा उचलत सर्वांसमवेत यशस्वी रित्या पूर्ण केले. सेटवर उपस्थित असलेल्या प्रत्येक कलाकार म्हणा वा इतर टीमच्या आरोग्याची विशेष काळजी घेत ‘डॉक्टर डॉक्टर’ या चित्रपटातील गाण्याचे चित्रीकरण त्यांनी नुकतेच आटोपले.

प्रेक्षकांप्रमाणे कलाकारही चित्रीकरणाला घेऊन आतुर झाले होते. तब्बल तीन महिन्याच्या कालावधी नंतर सरकारने दिलेल्या नियमावलींचे पालन करत या चित्रपटाच्या संपूर्ण टीम ने त्यांच्या आगामी ‘डॉक्टर डॉक्टर’ या चित्रपटाच्या गाण्याचे चित्रीकरण पूर्ण केले आहे.

‘डॉक्टर डॉक्टर‘ या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक प्रीतम पाटील यांनी केले आहे, त्यांच्या ‘खिचिक’ या चित्रपटानंतर त्यांचा हा नवाकोरा सिनेमा सिनेरसिकांच्या भेटीस ते आगळ्या वेगळ्या विषयाच्या कल्पकतेने घेऊन आले आहेत. ‘डॉक्टर डॉक्टर’ चित्रपटाची निर्मिती निर्माता सागर पाठक, सूरज दगडे पाटील, किरण कुमावत यांनी केली असून सहयोगी निर्माता म्हणून अभिनेता, निर्माता अमोल कागणेचा महत्वाचा वाटा आहे. विशेष म्हणजे निर्मिती क्षेत्रात पारंगत असलेल्या अमोलने या त्याच्या ‘डॉक्टर डॉक्टर’ चित्रपटात भूमिका साकारली आहे. अमोल सह या चित्रपटात अभिनेता प्रथमेश परब, पार्थ भालेराव, रमेश परदेशी, सिद्धेश्वर झाडबुके, विनोद खेडकर, विद्यान माने मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

‘हलाल’, ‘लेथ जोशी’, ‘परफ्युम’ यांसारख्या चित्रपटाच्या यशस्वी निर्मितीनंतर अमोल पुन्हा एकदा ‘डॉक्टर डॉक्टर’ या नव्या कोऱ्या चित्रपटाचा सहयोगी निर्माता म्हणुन प्रेक्षकांच्या समोर आला आहे. त्यामुळे अमोलचे एकाच चित्रपटातील निर्मिती आणि अभिनय कौशल्ये पाहण्यास प्रेक्षकांना औतस्युक्याचे ठरेल. तर ‘राजकारण २०१४’, ‘लग्न मुबारक’ सारख्या चित्रपटाच्या यशानंतर निर्माते सागर पाठक ‘डॉक्टर डॉक्टर’ या चित्रपटाच्या निर्मितीतून प्रेक्षकांसमोर येत आहेत, याबद्दल सागर पाठक म्हणाले की, हा नवा कोरा चित्रपट मी सिनेप्रेमींकरिता घेऊन येत असून  प्रेक्षकांच्या पसंतीस नक्की येईल यांत शंकाच नाही.