‘रिव्हिजिट सिनेमा’ या वेब शो ला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

मराठी दर्जेदार चित्रपटांकरिता 'रिव्हिजिट सिनेमा' हा वेब शो प्रेक्षकांसाठी पर्वणी. आशयघन आणि चौकटी बाहेरच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद.

कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या लॉकडाऊन च्या काळात बराचसा प्रेक्षक वर्ग ओटीटी प्लॅटफॉर्म, वेबसिरीज तर अगदी जागतिक चित्रपटांकडेही वळला. अशावेळी आपला प्रेक्षकवर्ग मराठी दर्जेदार चित्रपटांकडे कसा वळेल या अनुषंगाने ‘रॉ फिल्म्स’तर्फे तेजस साठे, मयुरेश भोर आणि टीम यांचा ‘रिव्हिजिट सिनेमा’ हा वेब शो सिनेप्रेमींकरिता एक पर्वणीच ठरला.

आशयघन आणि चौकटी बाहेरचे विषय घेऊन या वेब शो मार्फत आजतागायत चार चित्रपटांच्या प्रवासाची नव्याने ओळख करून दिली. आणि या नव्या ओळखीने तर जणू दमदार अशी रिव्हिजिट या चित्रपटांना मिळाली. प्रेक्षकांचा भरभरून असा प्रतिसादरिव्हिजिट सिनेमा मार्फत प्रसारित केलेल्या सर्वच चित्रपटांना मिळाला. नुकत्याच झालेल्या दिग्दर्शक रवी जाधव यांच्या ‘न्यूड’ या चित्रपटाच्या प्रवासाने तर एक नवा कोरा विषय प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरला. अगदी प्रेक्षकही दिग्दर्शकांच्या नजरेतून या चित्रपटांना नव्याने पाहू लागले. ‘धुडगूस’, ‘रेगे’, ‘टिंग्या’ आणि ‘न्यूड’ या चार चित्रपटांना ‘रिव्हिजिट सिनेमा’ या वेब शो मार्फत प्रेक्षकांपर्यंत रिव्हिजिट करण्यात उत्तम यश मिळाल असून प्रेक्षकांचाही दर्जेदार प्रतिसाद मिळाला आहे.

‘रिव्हिजिट सिनेमा’ या वेब शोच्या यशामागे या वेब शोचा अँकर कपिल रेडेकरचा महत्वाचा वाटा आहे. या वेब शो मध्ये कपिलचे सादरीकरण अर्थात वाखाणण्याजोगे आहे. खरंच कपिलचे सादरीकरण कौशल्य आणि या वेब शो ने निवडलेल्या कंटेंटची बांधणी प्रेक्षकांना लुभावणारी आहे. कपिल रेडेकर म्हणतो की, ‘रिव्हिजिट सिनेमा’ मार्फ़त आता पुढील आठवड्यात प्रेक्षकांकरिता एक अचंबित करणारा असा नवा कोरा विषय प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात अँकर कपिल रेडेकर कोणत्या चित्रपटाचा प्रवास दाखवणार याकडे सर्वच प्रेक्षक वर्गाचे लक्ष लागून राहिले आहे.