Search LEHREN

७ मराठी अभिनेत्रींचे मनोरंजक टॅटू

टॅटूसंबंधीचे गैरसमज दूर करत अनेक मराठी अभिनेत्रींनी आपल्या शरीराच्या विविध भागांवर टॅटू गोंदवले आहेत.

14th October 2019 | 10:59 AM (IST)
106 views

टॅटू म्हंटल की अजूनही काही लोकांची तोंडं वाकडी होतात. आजच्या प्रगत काळातही टॅटूकडे एका वेगळ्या नजरेने पाहिले जाते. टॅटूसंबंधीचे गैरसमज दूर करत अनेक मराठी अभिनेत्रींनी आपल्या शरीराच्या विविध भागांवर टॅटू गोंदवले आहेत.

मग ती एखादी तारीख असो, किंवा एखादा पक्षी किंवा एखाद फुल, टॅटू खास असलाच पाहिजे नाहीतर ते बनवून घेण्याची मजा काय. नाही का? आता पाहुयात आपल्या लाडक्या अभिनेत्रींचे काही मनोरंजक टॅटू.

. सई ताम्हणकर: सईने एक नव्हे तर चक्क चार टॅटूस गोंदवले आहेत. त्यापैकी एक तिच्या मानेवर आहे. रोमन लिपीत तिने आपल्या साखरपुड्याची आणि अमेय गोसावीने तिला प्रपोस केलेल्या दिवसाची तारीख आहे. त्याशिवाय तिच्या हातावर एक स्टार आहे आणि अमेयचे नाव हिब्रू भाषेत आहे.

. प्राजक्ता माळी: प्राजक्ताला एकेकाळी ओशो फिवर होता आणि त्या ओघात तिने ओशो या नावाचा टॅटू गोंदवले होता. मुळात तिला पान, फुल, पक्षी असं काहीही गोंडवायचं नव्हतं आणि म्हणूनच तिने हा टॅटू गोंदवला.

. सखी गोखले: सखीने तब्बल टॅटूज आपल्या शरीरावर गोंदवले आहेत. त्यातला पहिला तिच्या दंडावर आहे जो फुलपाखरू आहे. दुसरा टॅटू तिच्या हाताच्या मनगटावर आहे. आपल्या आईचे म्हणजेच शुभांगी गोखले यांच्या नावाचा हा टॅटू आहे. तिसरा टॅटू तिच्या मानेवर असून पक्ष्यांचा थवा तिने गोंदवला  आहे. चौथा टॅटू हा तिच्या शाळेचा देखावा दाखवणारा आहे जो तिच्या डाव्या हाताच्या दंडावर आहे.

. हृता दुर्गुळे: हृताचा हा पहिला वहिला टॅटू असून आपल्या खास दोन मैत्रिणींची नावे यात दडली आहेत. एच डी पी असे इंग्रजी मध्ये गोंदवले असून एच म्हणजेच हृता, डी म्हणजेच ध्रुवी आणि पी म्हणजे पूर्वा असा याचा अर्थ होतो.

. संस्कृती बालगुडे: हत्ती हा प्राणी संस्कृतीला अत्यंत प्रिय आहे आणि म्हणून तिने एका हत्तीच्या बाळाचे टॅटू आपल्या हातावर गोंदवले आहे. तिचा दुसरा टॅटू जरा हटके आहे. तिच्या हातावर एक डान्स करणारी मुलगी आहे आणि तिच्या समोर एक कॅमेरा आहे. त्या दोघांच्या अंतरामध्ये आय एम परफॉर्मर वि डोन्ट डाय असं लिहिलंय.

. श्रेया बुगडे: दुर्गा माँ ची भक्त असणारी श्रेया हिने आपल्या मानेच्या मागच्या बाजूला दुर्गा माँ गिडवून घेतली आहे. तसेच आपल्या उजव्या हातावर तिने इक्विलिब्रिअम म्हणजेच समानता याचा टॅटू गोंदवला आहे.

. शिवानी रांगोळे: शिवानी ने आपलट्या मनगटावर झेनिथ सनचा टॅटू बनवला आहे. याचा अर्थ पॉझिटिव्ह वाइब्स असा होतो.

Download The Lehren App For Latest & More News, Gossips, Videos And Podcasts.

14th October 2019 | 10:59 AM (IST)
106 views
×
×