शाहरुख खानच्या ‘क्लास ऑफ 83’ मध्ये झळकणार मराठमोळा पृथ्विक प्रताप

मराठमोळा फिल्मी अभिनेता पृथ्विक प्रताप बनला ‘क्लास ऑफ 83’ चा हिस्सा. पृथ्विकने साकारलेली या सिनेमातील भूमिका ही फारच इंटरेस्टिंग आहे, पण त्याविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडीशी प्रतिक्षा करावी लागेल.

20th July 2020 | 02:45 PM (IST)
106 views

कहाणी पूरी फिल्मी हैं’ असं हलकं-फुलकं वाक्य म्हणणारी आणि वाक्याप्रमाणे वावरणारीस्वत:मधील अभिनयाच्या टॅलेंटमुळे अनेकांची फेव्हरेट असणारी ही व्यक्ती किती फिल्मी असेल ना... नाम में क्या हैं’, असं जरी म्हंटलं असलं तरी स्वत:च्या हिमतीवरकौशल्यावर आणि मेहनतीने आणि ध्येयाने त्याने त्याचे नाव मोठे केले आहे आणि ही फिल्मी व्यक्ती मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय कलाकार आहे. आणि त्या व्यक्तीचे नाव आहे पृथ्विक प्रताप’.

अभिनयाची आवड असणा-या पृथ्विक प्रतापने मराठी मालिकासिनेमानाटकलघुपटवेबसिरीज इत्यादी माध्यमांत काम केले आहे. अनेक प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांत पृथ्विकने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. आंबट गोड’, ‘जागो मोहन प्यारे’, ‘हम बने तुम बने या मराठी मालिकांचाही तो प्रमुख हिस्सा होता. इतकेच नव्ह तर सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा पर्व २’ या कार्यक्रमात पृथ्विकने सहभाग घेतला होता आणि तो दुस-या पर्वाचा विजेता देखील ठरला. तसेच त्याने नाईट स्कूल’, ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’ या सिनेमांतही काम केले आहे. मालिकासिनेमानाटक या तीन मंचावर प्रेक्षकांची मने जिंकत त्याने वेबसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांचे आणखी मनोरंजन करण्यास सुरुवात केली. त्यात त्याने मराठी बॅक बेंचर्स’ आणि हिंदी लाखों में एक-२’ या वेब सिरीजमध्ये काम केले आहे.

आता लवकरच प्रेक्षकांनापृथ्विक एका नवीन सिनेमात दिसणार आहे ज्याची बातमी नुकतीच प्रदर्शित झाली आली आणि या बातमीची चर्चा सर्वत्र अगदी जोरदार पध्दतीने होत आहे. गेले एक-दोन दिवस 'नेटफिल्क्स काही तर सरप्राईज घेऊन येतंय...पण ते सिक्रेट आहेअसं देखील सोशल मिडीयाच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं आणि आता ते सिक्रेट सर्वांना समजले आहे. ते सिक्रेट आहे नेटफिल्क्सवरील ब्रँड न्यू १७ सिनेमांची घोषणा आणि या सिनेमांच्या यादीत पृथ्विकचा ही सिनेमा आहे ज्यामध्ये तो महत्त्वाची भूमिका साकारतोय आणि त्या सिनेमाचं नाव आहे क्लास ऑफ 83’.

रेड चिलीझ् एंटरटेनमेंट प्रॉडक्शनअतुल सभरवाल दिग्दर्शित आणि शाहरुख खानगौरी खानगौरव वर्मा निर्मित क्लास ऑफ 83’ या सिनेमात मराठमोळा अभिनेता महत्त्वाच्या भूमिकेत दिसणे ही मराठी सिनेसृष्टीसाठी आणि प्रेक्षकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. या सिनेमात पृथ्विकबॉबी देओलअनुप सोनीभूपेंद्र जाडावतनिनाद महाजनीहितेश भोजराज आणि समीर परांजपे या दिग्गज कलाकारांसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

 पृथ्विकने साकारलेली या सिनेमातील भूमिका ही फारच इंटरेस्टिंग आहेपण त्याविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडीशी प्रतिक्षा करावी लागेल. पृथ्विकच्या अभिनय कौशल्यामुळे त्याची या सिनेमासाठी निवड करण्यात आली ही देखील गौरवाची बाब आहे.

Download The Lehren App For Latest & More News, Gossips, Videos And Podcasts.

20th July 2020 | 02:45 PM (IST)
106 views
×
×