Search LEHREN

राझी नंतर अमृता खानविलकर दिसणार या बॉलीवूड चित्रपटात

राझी चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर अभिनेत्री अमृता खानविलकर आणखी एका बॉलीवूड चित्रपटात झळकणार आहे.

18th September 2019 | 06:24 PM (IST)
43 views

आलिया भट्ट आणि विकी कौशलच्या राझी या बॉलीवूड पटात एक मराठमोळा चेहरा झळकला तो म्हणजे अमृता खानविलकर. मुनीराच्या भूमिकेत दिसलेली अमृता, प्रेक्षकांना भलतीच आवडली.

 

 

आता अमृताने आणखी एक बॉलीवूड चित्रपट मिळवला असून आदित्य रॉय कपुर आणि दिशा पाटणी यांच्या मलंग या सिनेमात ती दिसेल. मोहित सूरी दिग्दर्शित या चित्रपटात अनिल कपूर आणि कुणाल खेमू हे कलाकार सुद्धा असतील.

 

 

अमृताने आपल्या पात्रासाठी विशेष मेहनत घेतली आहे. तिने तब्बल १२ किलो वजन कमी करत कठीण डाएट आणि एक्सरसाईझ फॉलो केले आहे. अजूनतरी हे माहित नाही की ती कोणाच्या ऑपोसिट दिसणार आहे पण असं ऐकण्यात आलाय की समोरचा अभिनेता खूप फिट आहे आणि म्हणून अमृतानेसुद्धा आपल्या फिटनेस वर मेहनत घेतली आहे.

 

 

राझीच्या अभूतपूर्व यशाचा अमृताला नक्कीच फायदा झालेला दिसतोय.

Download The Lehren App For Latest & More News, Gossips, Videos And Podcasts.

18th September 2019 | 06:24 PM (IST)
43 views
×
×