Search LEHREN

''नेबर्स '' चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच 

कल्पना रोलिंग पिक्चर्स प्रौडक्शन' निर्मित आणि 'मिठुवाला प्रौडक्शन्स' यांचा सादरीकरण ''नेबर्स '' चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच

24th February 2020 | 12:09 PM (IST)
122 views

निर्माते हितेश पटेल आणि दिग्दर्शक विनय श्रीरंग घोलप यांच्या या चित्रपटात एका तरुणीची गूढरम्य कहाणी चित्रित करण्यात आली आहे. 

 

विज्ञान-तंत्रज्ञानाची कल्पनारम्य कथा असलेल्या या चित्रपटात चेतन चिटणीस, कृत्तिका गायकवाड, सिद्धार्थ बोडके, प्रसाद जावडे, शैलेश दातार, नेहा बंब, अदिती येवले आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या २० मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.  

दिग्दर्शक विनय घोलप यांचीच पटकथा असलेल्या या चित्रपटाचे संवाद हृषीकेश कोळी आणि विनय घोलप यांनी लिहिले आहेत तर छायालेखनाची  महत्वाची जबाबदारी कॅमेरामन आशुतोष आपटे यांनी सांभाळली आहे. गीतकार मंगेश कांगणे यांच्या गीतांना संगीतकार निषाद स्टोरी यांनी स्वरसाज चढविला आहे. पार्श्वसंगीतही त्यांनीच दिले आहे. श्री गुरु पाटील आणि महेश किल्लेकर यांनी संकलन केले असून चित्रपटाची तांत्रिक बाजू सर्वश्री विशाल तालकर (व्हीएफएक्स), भूषण दळवी (डीआय), आणि दिनेश उचिल व शंतनू अकेरकर (ध्वनी-रेखन), अनुप देव आदी तंत्रज्ञांनी सांभाळली आहे. चित्रपटाचे कार्यकारी निर्माते राहुल भोसले असून कला दिग्दर्शन संजीव राणे यांनी केले आहे. शीतल पावसकर यांनी वेशभूषेची जबाबदारी सांभाळली आहे.

येत्या २० मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Download The Lehren App For Latest & More News, Gossips, Videos And Podcasts.

24th February 2020 | 12:09 PM (IST)
122 views
×
×