Search LEHREN

आजोबांना आले अमिताभजींचे पत्र आणि ‘एबी आणि सीडी’चा टीझर पाहून वाढणार प्रेक्षकांची उत्सुकता

प्रत्येकाची कल्पनाशक्ती ही भन्नाट असते. एकदा कल्पना करुन पाहा ना, 'जर तुमच्या आजोबांचे वर्गमित्र हे अमिताभजी बच्चन असतील तर...' तर काय? सगळीकडे नुसता आनंदाचा गोंधळ उडेल, कुटुंबातील सदस्यांचे, मित्र परिवारांकडून सतत कुतूहलाचे प्रश्न उपस्थित होतील. ‘तुमच्या मैत्रीचे, शाळेतील किस्से सांगा’, ‘अमिताभजी शाळेत असताना कसे होते’, ‘कसे वागायचे’, ‘नेमके काय बोलायचे’ यांसारखे अनेक शंभर प्रश्न तुमच्या आजोंबाना विचारले जातील. असंच काहीसं घडलंय ‘एबी आणि सीडी’ या सिनेमातील ‘चंद्रकांत देशपांडे’ यांच्या बाबतीत.

24th February 2020 | 11:42 AM (IST)
109 views

आजी-आजोबा आणि नातवंड यांच्यामधील नातं हे फारच हलकंफुलकं असतं. आपल्या हक्काची आणि तितकीच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत समजून घेणा-या व्यक्ती म्हणजे आजी-आजोबा असं प्रत्येक नातवाला वाटत असतं आणि ते तितकंच खरंही असतं. जसजसं म्हातारपण येतं तसतसं घरातल्यांना म्हातारे व्यक्ती या अडचण वाटू लागतात किंवा त्यांच्याकडे फार लक्ष द्यावसं नाही वाटत आणि याचवेळी त्यांचा खंबीर आधार बनतात त्यांची नातवंड. अशीच विक्रम गोखलेअक्षय टंकसाळेसाक्षी सतिश यांची आजोबा-नातवंडांची जोडी एबी आणि सीडी’ मध्ये पाहायला मिळणार आहे.

एबी आणि सीडीच्या पोस्टरनंतर आता या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे आणि आजोबांना अमिताभजींकडून आलेलं पत्रंतसेच त्यांच्याकडून सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आलेला होकारपण नंतर चंद्रकांत देशपांडे यांनी स्वत: आज अमिताभ बच्चन सोहळ्याला येणार नाही’ हे केलेले वक्तव्य आणि अमिताभजींच्या दमदार आवाजातील चंदू मी आलोय’ हा डायलॉग’....या सर्व गोष्टी प्रेक्षकांची सिनेमाप्रती उत्सुकता वाढवणार यात बिलकुल शंका नाही.

अमिताभजींनी गेली अनेक वर्षे सिनेसृष्टीतील प्रत्येक कलाकाराच्या आणि सिनेरसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे आणि त्यामुळेच अमिताभ बच्चन’ म्हटलं की सर्वप्रथम कुतुहल वाटतं आणि जर अमिताभजी तुमच्या आजोबांचे वर्गमित्र असतील तर बातच निराळी होऊन जाते... 

अक्षय विलास बर्दापूरकरप्लॅनेट मराठीगोल्डन रेशो फिल्म्स निर्मित आणि पीव्हीआर प्रदर्शित आणि मिलिंद लेले दिग्दर्शित एबी आणि सीडी’ मध्ये अमिताभजी बच्चनविक्रम गोखले यांच्यासह सुबोध भावेसायली संजीवअक्षय टंकसाळेसाक्षी सतिशशर्वरी लोहोकरेनीना कुळकर्णीलोकेश गुप्तेसीमा देशमुखसागर तळाशीकर यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.

 आता खरंच उत्कंठा ताणली जातेय की 'येतील का बिग बी उर्फ एबी सोहळ्याला?

अमिताभ बच्चन आणि चंद्रकांत देशपांडे उर्फ एबी आणि सीडीचा याराना बघेल सारा जमाना१३ मार्चला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात.

Download The Lehren App For Latest & More News, Gossips, Videos And Podcasts.

24th February 2020 | 11:42 AM (IST)
109 views
×
×