अभिनेता वृषभ शहाची उल्लेखनीय कामगिरी

वृषभने त्याच्या 'मंगलाष्टक रिटर्न' या चित्रपटाच्या साइन केलेल्या रकमेतून केली रिअल हिरोजना मदत.

4th July 2020 | 01:02 PM (IST)
67 views

सध्या सर्वच कलाकार कोरोना अभावी गरजूंना मदतीसाठी पुढे सरसावल्याचे चित्र दिसत आहे. कलाकारांनी केलेल्या मदतीबद्दल काही शंकाच नाही मात्र तरुण, नवकलाकारांची मदतीसाठीची रेलचेल ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे. अभिनेता वृषभ शहा हा नवोदित कलाकार असून आता लवकरच तो  'शारदा प्रॉडक्शन' निर्मित 'मंगलाष्टक रिटर्न' या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिकेकरिता वृषभला नामवंत, हुशार अशा एका दिग्दर्शकाने साइन केले आहे.

विशेष म्हणजे वृषभने साइन केलेल्या या चित्रपटाच्या रकमेतूनच स्वतः साठी काहीही खर्च न करता सध्याच्या रिअल हिरोजना म्हणजेच आपल्या पोलीस बांधवांना थर्मोमिटर, सॅनिटायझेशन बॉक्स, एनडी ऑकसोमिटर देऊन त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मदतीसाठी धाव घेतली आहे. त्याची ही कर्तबगारी अर्थातच वाखाणण्याजोगी आहे. अभिनेता वृषभ शहाने केलेली ही कामगिरी नक्कीच उल्लेखनीय आहे. वृषभची ही धाडसी आणि मदतीसाठी पुढे सरसावणारी वृत्ती नक्कीच त्याच्या अभिनयातून दिसेल यात शंकाच नाही.  अशा प्रकारची मदत करून वृषभने सर्वच रसिक प्रेक्षकांच्या मनात मोठ्या पडद्यावर झळकण्याआधीच घर केले आहे.

Also Read ‘Revisit Cinema’ या वेब शो मधून उलगडणार मराठी चित्रपटांचा इतिहास

याबद्दल वृषभ म्हणाला, 'सध्या कोरोनाचे सावट दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र आपण पाहतच आहोत, आणि या महामारीच्या काळात आपल्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे असणाऱ्या पोलीस बांधवांचा मी कायम ऋणी आहे. आज ते आपल्या सर्वांसाठीच रिअल हिरोज ची भूमिका अगदी काटेकोर पणे बजावत आहेत. आणि म्हणूनच या आपल्या रिअल हिरोजकरिता एक लहानसा खारीचा वाटा म्हणून मी माझ्या 'मंगलाष्टक रिटर्न' चित्रपटाच्या साइन केलेल्या रकमेतून ही मदत माझ्या वाढदिवशी करण्याचे ठरविले आहे.'

 वृषभची ही आगळीवेगळी मदत नक्कीच प्रत्येक प्रेक्षकांच्या लक्षात राहील. त्याची ही उल्लेखनीय कामगिरी नक्कीच त्याच्या भावी आयुष्यात त्याला कामी येईल.

Download The Lehren App For Latest & More News, Gossips, Videos And Podcasts.

4th July 2020 | 01:02 PM (IST)
67 views
×
×