- Advertisement -
- Advertisement -

अभिनेत्री अमृता सुभाषकडे आहे या प्रसिद्ध अभिनेत्रीची ओढणी

अभिनेत्री अमृता सुभाषने आपल्याजवळ असलेल्या एका अनमोल गिफ्ट बद्दल खुलासा केला. सविस्तर वाचा.

एखाद्या कलाकाराला प्रेक्षकांच्या टाळ्या आणि त्यांनी त्यांच्या कामाबद्दल दिलेली पोच पावती हे सगळ्यात मोठं गिफ्ट असतं. पण कधी कधी एखाद्या दुसऱ्या कलाकारांकडून मिळालेली छोटीशी भेटवस्तू सुद्धा एक अनमोल ठेवा ठरू शकते. असंच काहीसं आहे अमृता सुभाषबद्दल. झालं असं की अमृताने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली ज्यात तिने आपल्याकडे असलेल्या एका मौल्यवान वास्तूबद्दल सांगितले.

अमृता कडे दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांची ओढणी आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिओ मामी फिल्म फेस्टिवल २०१९ मध्ये अमृताने ती ओढणी ओढली होती. त्याबद्दल सांगताना अमृता लिहितेआज स्मिताताई पाटीलचा वाढदिवस होता. त्याच दिवशी मामी मोहोत्सवाचं उद्घाटन हा अपूर्व योगायोग.. ही ओढणी तिची आहे. तिच्या ताईनं माझं अस्तु मधलं काम बघून मला दिली होती. आणि सांगितलं होतं, तू जेव्हा या क्षेत्रात काम करणं थांबवशील तेव्हा तुझ्यानंतर ही ओढणी अशा मुलीला दे जी तुझ्या मते स्मिताची परंपरा पुढे नेत असेल. ही भेट माझ्यासाठी अमूल्य आहे. आज तिच्या वाढदिवशी तिची आठवण काढत तिची ही ओढणी घेतली. तिच्यासारखं मोठं कुंकू लावून झुमके घालून या समारंभाला पोचले. कार्यक्रम सुरु झाला आणि एक विलक्षण गोष्ट घडली. त्या बंद आॅडीटोरिअम मधे झगमगत्या दिव्यात एक सुंदर फुलपाखरु आलं. प्रेक्षकात उडायला लागलं. अनेकांना त्या ठीकाणी ते फुलपाखरु पाहून आश्चर्य वाटलं. थोड्या वेळ उडून ते निघून गेलं. काहीच वेळात दिपीका पदुकोन आणि विशालजी भारद्वाजांनी दिप्ती नवलजींना पुरस्कार दिला. त्यावेळी दिप्तीदींच्या कामावर आधारित व्हीडीओ सुरु झाला आणि एका अवचित क्षणी स्मितादी आणि दिप्तीदिंचा फोटो पडद्यावर झळकला. माझे डोळे भरुन आले.”

अमृताच्या फॅन्सने सुद्धा ती यासाठी योग्य दावेदार असल्याचे सांगितले.

- Advertisement -

Latest Stories