- Advertisement -
- Advertisement -

ज्येष्ट अभिनेते जयराम कुलकर्णी काळाच्या पड्द्या आड

प्रख्यात मराठी अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे मंगळवारी सकाळी पुण्यात वृद्धापकाळाशी संबंधित आजारांमुळे निधन झाले, असे एका कुटुंबातील सदस्याने सांगितले. ते ८८ वर्षांचे होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि सून मृणाल कुलकर्णी (अभिनेत्री ) असा परिवार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तहसीलमध्ये जन्मलेल्या कुलकर्णी यांनी दीडशेहून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला होता.

चल  रे  लक्ष्या  मुंबईला, अशी हि बनवाबनवी, थरथराट, रंगत संगत, अश्या काही नावाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते.

त्यांचा नवीन चित्रपट ‘खेळ आयुष्याचा’ नुकताच रिलीझ झाला होता.

अभिनयात पूर्ण कारकीर्द घेण्यापूर्वी कुलकर्णी यांनी पुण्यात आकाशवाणीमध्ये काम केले होते जेथे साहित्य, नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींच्या ते संपर्कात आले.

त्यांच शेवटच अंत्यदर्शन पुण्यात नंतर करण्यात येईल.

YOU MAY ALSO LIKE...
- Advertisement -

Latest Stories